Big news: 5G technology and spectrum trials approved in India, telecom department decision, no Chinese company approved

मोठी बातमी : देशात 5जी तंत्रज्ञान आाणि स्पेक्ट्रमच्या ट्रायल्सला मंजुरी, दूरसंचार विभागाचा निर्णय, एकाही चिनी कंपनीचा समावेश नाही

5G technology and spectrum trials : केंद्रीय दूरसंचार विभागाने देशात 5जी तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा पुरवठादार भारतात विविध ठिकाणी 5G चाचणी सुरू करणार असल्याचे मंगळवारी मंत्रालयाने सांगितले. या चाचण्या ग्रामीण, अर्ध-शहरी आणि शहरी भागात घेण्यात येतील. विशेष म्हणजे मंजुरी मिळालेल्यांमध्ये एकाही चिनी कंपनीचा समावेश नाही. Big news: 5G technology and spectrum trials approved in India, telecom department decision, no Chinese company approved


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय दूरसंचार विभागाने देशात 5जी तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा पुरवठादार भारतात विविध ठिकाणी 5G चाचणी सुरू करणार असल्याचे मंगळवारी मंत्रालयाने सांगितले. या चाचण्या ग्रामीण, अर्ध-शहरी आणि शहरी भागात घेण्यात येतील. विशेष म्हणजे मंजुरी मिळालेल्यांमध्ये एकाही चिनी कंपनीचा समावेश नाही.

भारतीय दूरसंचार मंत्रालयानुसार, दूरसंचार सेवा पुरवठादार देशात 5जीचे तंत्रज्ञान व स्पेक्ट्रमच्या चाचण्या पुढील सहा महिन्यांसाठी घेऊ शकतात. यासाठी चीनसोडून इतर अनेक राष्ट्रीयतेच्या फर्म्सना मंजुरी मिळाली आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सपैकी जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएल यांना मंजुरी मिळाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हे ऑपरेटर्स मूळ उपकरण निर्माते आणि तंत्रज्ञान पुरवठादार एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉट सोबत मिळून काम करतील. याशिवाय जिओ प्लॅटफॉर्मला त्यांच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चाचण्या घेण्यास परवानगी मिळालेली आहे.

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात चीनबद्दल स्पष्टपणे काहीही लिहिण्यात आलेले नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार चीनच्या हुवावे व झेडटीई यांना मंजुरी मिळालेली नाही. केंद्रीय मंत्रालयाने म्हटले की, त्यांनी अशा सेवा पुरवठादारांना परवानगी दिली आहे, ज्यांनी आपल्या प्राथमिकता आणि प्रौद्योगिकी भागीदारांना निवडले. प्रायोगिक स्पेक्ट्रम विविध बँड्समध्ये दिले जात आहे, ज्यात मिड बँड, मिलीमीटर वेव्ह बँड आणि सब गीगाहर्टझ बँड यांचा समावेश आहे. प्रौद्योगिकी सेवा प्रदात्यांना 5जी परीक्षणाच्या संचालनासाठी त्यांच्या 800, 900, 1800 आणि 2500 मेगाहर्टझ स्वामित्व असलेल्या सध्याच्या स्पेक्ट्रमचा वापर करण्याची अनुमती असेल.

भारत आणि चीनमध्ये उडालेल्या संघर्षानंतर भारताने चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी एक नियम संशोधित केला होता. तेव्हापासून टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि पबजी मोबाइलसहित 200 पेक्षा जास्त अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. अशा अॅप्सद्वारे भारतीयांच्या डाटाचा चीनकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. केंद्राच्या या निर्णयानंतर आता भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. भारतीय टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज खेळाडू चीनची कोणतीही मदत न घेता पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 5जी सेवा लाँच करणार आहे.

Big news: 5G technology and spectrum trials approved in India, telecom department decision, no Chinese company approved

महत्त्वाची बातमी