Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु, ३८५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार


वृत्तसंस्था

बेळगाव :  दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान सुरु झाले. ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली असून ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. निवडणुकीसाठी प्रथमच मतदान यंत्राच वापर होत आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून १,८२६ कर्मचारी नियुक्त केले आहेत. Belgaum Municipal Corporation Election

बेळगाव महापालिका निवडणूक दृष्टिक्षेपात

  •  एकूण ५८ प्रभागांसाठी मतदान
  •  ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
  •  भाजप ५५ , काँग्रेस ४५ , महाराष्ट्र एकीकरण समिती २१, जेडीएस ११ , आम आदमी ३७, एआयएमआयएम ७ , अन्य दोन आणि अपक्ष , असे
  • २१७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
  •  एकूण मतदार ४२८३६४ असून त्यामध्ये २१३५३६ पुरुष आणि २१४८३४ महिला मतदार आहेत.
  •  मतदानासाठी ४१५ मतदान केंद्रांची व्यवस्था
  •  निवडणुकीसाठी १८२८ कर्मचारी नियुक्त आहेत.
  •  पोलिस आणि होमगार्ड बंदोबस्तासाठी नेमले आहेत.

राष्ट्रीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला

भाजप, काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समिती, आम आदमी पार्टी, एमआयएम आणि अन्य दोन पक्ष निवडणूक रिंगणात आहे

Belgaum Municipal Corporation Election

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण