माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुखपद स्वीकारणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.bcci chief ganguly confirms vvs laxman to take charge as nca head
वृत्तसंस्था
मुंबई : माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान झाल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुखपद स्वीकारणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. एएनआयने ही माहिती दिली आहे.
भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी माजी क्रिकेटपटूंनी व्यवस्थेत यावे, असे गांगुलीने नेहमीच ठळकपणे म्हटले आहे. केवळ गांगुलीच नाही तर बोर्डाचे सचिव जय शाह आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्मण यांनी एनसीएचे प्रमुख म्हणून काम करावे अशी इच्छा होती.
यापूर्वी बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले होते की, लक्ष्मणचे राहुल द्रविडसोबत खास नाते आहे हे आपण विसरू नये. हे दोघेही भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी काम करणे हे खूप चांगले संयोजन असेल. विशेष म्हणजे द्रविड न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कामाला सुरुवात करणार आहे. द्रविडने प्रशिक्षक झाल्यानंतर त्याचा रोडमॅप आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा वारसा कसा पुढे चालवायचा आहे याचा उल्लेख केला आहे.
द्रविड म्हणाला होता, “भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि या भूमिकेबद्दल मी खूप उत्साहित आहे. शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे आणि मी हे पुढे नेण्यासाठी संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे. NCA, U-19 आणि India-A मधील बहुतेक मुलांसोबत जवळून काम केल्यामुळे, मला माहिती आहे की त्यांच्यात दररोज सुधारण्याची आवड आणि इच्छा आहे. पुढील दोन वर्षांत काही मोठे कार्यक्रम आहेत आणि मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App