उत्तराखंडात सरकारी कार्यालयात जीन्स व टी-शर्ट परिधान करण्यास बंदी


वृत्तसंस्था

डेहराडून : सरकारी कार्यालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत सहभागी होताना जीन्स व टी-शर्ट घालण्यास उत्तराखंड सरकारने बंदी केली आहे. उत्तराखंडमधील सर्व सरकारी कार्यालयांमधील बैठकांमध्ये जीन्स व टीशर्ट असा अनौपचारिक पेहराव करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचारी यांनी हा वेशभूषेबाबतचा संकेत पाळणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. Ban on T shirt and jeans in govt. offices



बागेश्वकर जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी विनीत कुमार यांनी हा आदेश दिला आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणताही विशेष गणवेश राज्य सरकारने निश्चदत केलेला नाही. ‘ड्रेस कोड’चा आदेश काढणारे उत्तराखंड हे पहिलेच राज्य नाही. यापूर्वी अशाच आदेश उत्तर प्रदेश सरकारनेही लागू केला होता. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. बिहार, तमिळनाडू, राजस्थान कर्नाटक, हिमाचल प्रदेश या राजांनीही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू केला आहे.

Ban on T shirt and jeans in govt. offices

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात