लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवातला महत्तम संस्कृतीत पैलू!!


लोकमान्यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवातले राष्ट्रीय आणि सामाजिक कार्य मोठेच आहे. पण त्यातून नकळत घडलेले सांस्कृतिक कार्य इतके मोठे आहे की त्याने सार्वजनिक गणेशोत्सवच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवनच जणू व्यापून उरले आहे. greatest cultural aspect of Lokmanya’s public Ganeshotsav

सार्वजनिक गणेशोत्सव आणि महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात क्रांती आणली पण त्याहीपेक्षा सांस्कृतिक जीवनात आणलेली क्रांती कितीतरी दूरगामी आणि खोलवर आहे हे नेमके लक्षात घेतले पाहिजे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात जेवढे म्हणून महान कलावंत गाजले त्यापैकी प्रत्येकाच्या कलेची मूळे कुठे ना कुठे तरी लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात रुजलेली दिसतात. महाराष्ट्राचा प्रत्येक कलावंत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मांडवाखालून गेलाच आहे. महाकवी ग. दि. माडगूळकर आणि पासून ते गीत रामायण गायक सुधीर फडके यांच्यापर्यंत आणि शास्त्रीय गायनातल्या तेजस्वी तारा हिराबाई बडोदेकर यांपासून संजीव अभ्यंकरांपर्यंत प्रत्येक कलावंत सार्वजनिक गणेशोत्सवात विद्या कलेची देवता श्रीगणेशाच्या आराधनेतूनच बाहेर पडल्याचे दिसते.

ही ग्वाही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांनी दिली आहे. पुलंच्या मते सार्वजनिक गणेशोत्सवाने महाराष्ट्राची सांस्कृतिक उंची एवढी वाढली की त्याने गगन भेदलेय. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येक कलावंताला विद्येच्या देवतेचे व्यासपीठ दिले आणि असंख्य कलावंतांना पहिला कलाविष्कार श्री गजाननाच्या चरणी अर्पण करण्याची संधी दिली.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास लिहिताना अनेक मोठमोठ्या इतिहासकारांनी आणि राजकीय विचारवंतांनी त्याच्या राजकीय आणि सामाजिक पैलूकडे जरूर लक्ष दिले. पण सार्वजनिक गणेशोत्सव आणि अनुषंगाने का होईना पण निर्माण केलेला हा संस्कृती पैलू महाराष्ट्राची लोकमान्यांची आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची आगळी महती सांगून जातो…!!

greatest cultural aspect of Lokmanya’s public Ganeshotsav

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात