वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. वाढत्या कोरोना, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.Ban on international flights until 31January 2022
याबाबत डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA)ने माहिती दिली आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणारे इच्छुक हिरमुसले आहेत.गुरुवारी रात्री डीजीसीएने याबाबत एक आदेश जारी करून ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे. परंतु मालवाहतुकीवर कोणतेही बंधन घातलेले नाही.
कोरोना धोका पाहता २६ नोव्हेंबरच्या आदेशात बदल केला आहे. यापूर्वी १५ डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला परवानगी दिली होती. ती आता नव्या आदेशाने मागे घेतली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला. त्यामुळे आता सरकारने ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार नसल्याचे जाहीर केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App