वृत्तसंस्था
पुणे : इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयाचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी होणार आहे.In one book first four subjects; The burden on the backs of the students will be less
प्रथम इयत्ता पहिली आणि त्यानंतर सर्व प्राथमिक वर्गांसाठी ही योजना लागू केली जाईल. पहिलीमध्ये शिकवले जाणारे चार विषय – इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिक; प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले आहेत. प्रत्येक विषयाचे पुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी, विद्यार्थ्याने सत्रानुसार आता फक्त एकच पाठ्यपुस्तक आवश्यक आहे.
बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी सांगितले की, “सध्या पहिलीचा विद्यार्थी, जो सुमारे ६ वर्षांचा आहे, त्याच्या बॅगेत किमान८३० ग्रॅम पुस्तकांचे वजन असते. पाण्याची बाटली, डब्बा आणि पुस्तकांचे बॅगेचे वजन १ किलोग्रॅमच्या पुढे जाते. परंतु नव्या पद्धतीमुळे पाठ्यपुस्तकांचे वजन २१० ग्रॅमपर्यंत कमी होते. पुढील वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more