भारतातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे. यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याच निर्णय घेतला आहे.अवघ्या काही दिवसातच 50 देशांच्या आसपासाचा आकडा ओमिक्रॉनने पार केला आहे.International flights banned in India till January 31

त्यामुळे जगातील सर्वच देशांकडून काही निर्बंध लावण्यात येत आहेत. काही देशांनी तर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन लावले आहे. ओमिक्रॉनचा धोका ओळखून भारतातही काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉनचा धोका ओळखून भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे.



यापूर्वी 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनचा वाढता प्रसार पाहता हा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. अलिकडेच समोर आलेल्या संशोधनातून काही नवी माहिती समोर आली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार हा डेल्टापेक्षाही अधिक वेगाने होतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला आहे.

देशातील अनेक विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाहेरून येणाºया प्रवाशांना विलगीकरणातही ठेवले जात आहे. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

International flights banned in India till January 31

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात