हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे बाळासाहेब पहिले नेते; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

मुंबई – हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते होते. त्यांचा मतदानाचा अधिकार त्या मुद्द्यावर काढून घेण्यात आला होता, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केले. Balasaheb Thackeray was the first leader to win election on Hindutva agenda, claims CM Uddhav Thackeray

लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी १९८७ साली झालेल्या पार्ले येथील पोटनिवडणुकीची आठवण सांगितली. शिवसेना आणि भाजपा यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीची सुरुवात खऱ्या अर्थाने १९८७ सालापासून झाल्याचे ते म्हणाले. “याची सुरुवात १९८७ साली झाली. डॉ. रमेश प्रभू यांची कदाचित भारतातली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेलेली आणि जिंकलेली पहिली निवडणूक होती पार्ल्याची पोटनिवडणूक. शिवसेनेने ती लढवून जिंकली होती.

शिवसेनाप्रमुख हे या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे देशातील पहिले नेते ठरले. त्यानंतर हिंदुत्व या मुद्द्याच्या प्रचाराच्या गुन्ह्याची किंमत त्यांना भोगावी लागली. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता. त्यानंतर ८९ च्या आसपास रथयात्रा वगैरे सुरू झाली. हिंदू नागरिक हिंदू म्हणून मतदान करू शकतात, हे ८७ सालच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिले होते. आम्ही दोन्ही पक्ष तोपर्यत राजकीय अस्पृश्य होतो”, असे उद्ध ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजपासोबत युती तुटल्याचा संदर्भ उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. “आमचा युतीचा मोठा कालखंड विरोधी पक्ष म्हणून गेला आहे. आम्ही राजकीय अस्पृश्य होतो. वाईट काळात एकत्र आलो होतो. पण वाईट काळ गेल्यानंतर वेगळे का झालो? हे का घडले हा प्रश्न जनतेलाही पडला असेल. एका विचाराच्या पायावर झालेली युती तुटली का? हा प्रश्न आधी येतो. पण आमची आज युती नसली, तरी हिंदुत्वाचे विचार सगळ्यांना पटले आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही असे म्हटले होते. त्यांचे हिंदुत्व राष्ट्रीयत्वाशी संबंधित होते”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Balasaheb Thackeray was the first leader to win election on Hindutva agenda, claims CM Uddhav Thackeray

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात