सेवा ही संघटन 2 ! जनसेवेस तन-मन-धन समर्पित भाजप : सेवा दिवसाच्या निमित्ताने 33 राज्यातील 1.53 लाख गाव-वस्तीत सेवा कार्य ;66 हजार कार्यकर्त्यांचे रक्तदान


  • मोदी सरकारला सत्तेत येऊन 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण झाली असून कोरोनाचे संकट पाहता भाजपचे सरकार असलेल्या राज्यात मुख्यमंत्र्यांना जेपी नड्डा यांनी एक पत्र लिहिले .

  • आजच्या दिनी कोणताही जल्लोष करण्यात येऊ नये. त्याऐवजी स्थानिक सरकारांनी कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याचसोबत कोरोनामुळे फटका बसलेल्या नागरिकांना मदत करावी.

  • आणि या  योजनेनुसार पक्षातील नेते मंडळीनी 1 लाख गावांचा दौरा केला. या दरम्यान भाजपचे कार्यकर्त्यांनी  गावातील लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि राशन सारख्या गरजेच्या वस्तूंचे वाटप केले  त्याचसोबत कोरोना पासून बचाव करण्यासंदर्भात जनजागृती सुद्धा केली . ऐवढेच नाही तर केंद्रीय मंत्र्यांनी देखील गावांचे दौरे केले .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:नरेंद्र मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशातील सुमारे एक लाख खेड्यांमध्ये ‘सेवा ही संघटन 2’ मोहिमेअंतर्गत कोविडशी संबंधित विशेष मदत आणि बचाव अभियान राबवले.पंतप्रधान मोदी आणि पक्षप्रमुख जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची नि: स्वार्थ सेवा जनतेसाठी अविरत सुरू आहे आणि भारत कोरोनाला पराभूत करेपर्यंत हे चालूच राहील.Sewa Hi Sanghtan 2! BJP dedicated to public service: Service work in 1.53 lakh villages in 33 states on the occasion of service day; blood donation of 66 thousand BJP workers

सेवा ही संघटना 2.0 चा भाग म्हणून देशभरातील सुमारे एक लाख गावात कोविडग्रस्तांसाठी भाजप  पक्षाने विशेष मदत, सुरक्षा आणि कल्याणकारी मोहीम राबवली .

देशभरात आयोजित कार्यक्रमांची माहिती सांगत राज्यसभा सदस्य आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले की, पक्षासाठी ही अत्यंत अभिमान व समाधानाची बाब आहे आणि भाजपा कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व कार्य केले   “सेवा दिवस”  लोकांच्या सेवेसाठी ठरवलेली सर्व उद्दिष्टे आणि लक्ष्य ओलांडत तन-मन-धनाने सेवा केली .

30 मे रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी 1,77,463 गावात 48,885 शहरी भागातील गरजू व गरीबांना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबविली. 30 मे रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी 1888 जिल्हा केंद्रांवर आणि मंडल (ब्लॉक) स्तरावर 6315 विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन केले.

सिंह यांच्या मते, कोरोनव्हायरसशी लढण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी 16.5 लाख प्रतिकारशक्ती कीट वितरित केले आणि एक कोटीहून अधिक फेस मास्कसुद्धा वितरित केले. त्यांनी 13.5 लाखांहून अधिक रेशन किट आणि सुमारे 10 लाख फूड पॅकेटचे वितरण केले.

त्याशिवाय देशभरात सुमारे 36000 कोविड जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 28 मे ते 30 मे या कालावधीत तीन दिवसीय रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, 50000 युनिट रक्त संकलित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते . परंतु रक्तदान शिबिरात भाजप कार्यकर्त्यांनी इतक्या उत्साहाने सहभाग घेतला आणि लक्ष्य ओलांडत 71432 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

Sewa Hi Sanghtan 2! BJP dedicated to public service: Service work in 1.53 lakh villages in 33 states on the occasion of service day; blood donation of 66 thousand BJP workers

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात