विशेष प्रतिनिधी
लखनऊ : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने कोरोना व्यवस्थापनात उत्तुंग कामगिरी केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देशात कौतुक होत आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या एका मंत्र्यांनीही योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा करत उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.Australian minister praises Yogi Adityanath’s corona management, wishes to work with Uttar Pradesh government
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत योगी आदित्यनाथ यांनी मिशन मोडमध्ये काम केले. ट्रॅक, टेस्ट अॅँड ट्रिट ही ट्रिपल- टी रणनिती त्यांनी आखली. तब्बल २४ कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात त्याचा व्यापक परिणाम झाला. कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योगींचे कौतुक केले होते.
आता ऑस्ट्रेलियाचे मंत्री जेसन वुड यांनीही उत्तर प्रदेश सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. आपल्या राज्यातील कोरोनाचा कहर रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करण्याची इच्छा जेसन वुड यांनी व्यक्त केली आहे.
जेसन वुड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की आम्ही उत्तर प्रदेशासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. संस्कृती आणि विकासाच्या संवर्धनासाठी ऑस्ट्रेलयिातील लोक उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मला संदेश दिला होता.
या कठीण काळात उत्तर प्रदेश सरकारने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांनी कौतुक करायला हवे.यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे खासदार क्रेग केली यांनी उत्तर प्रदेशच्या करोना व्यवस्थापनावरून योगी सरकारचे कौतुक केले होते. क्रेग यांच्या ट्वीटला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिक्रिया देत त्यांनाभारतात भेटी निमंत्रण देण्यात आले होते.
आमच्या अनुभवांची माहिती देऊ असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. ऑस्ट्रेलयिात आयवरमॅक्टिन या औषधाचा तुटवडा आहे. सीम योगींना आपल्या देशात पाठवलं तर औषधांच्या तुटवड्याची समस्या दूर करण्यास मदत होईल, असं ट्वीट क्रेग केली यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App