लहान मुलांच्या मृत्यूंमुळे व्यथित होऊन एक खासदार संसदेत धाय मोकलून रडले होते. तेच खासदार मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या सहाकार्याने उपाययोजना राबविल्या आणि लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अगदी कमी झाले, अशी आठवण सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.
विशेष प्रतिनिधी
लखनौ: लहान मुलांच्या मृत्यूंमुळे व्यथित होऊन एक खासदार संसदेत धाय मोकलून रडले होते. तेच खासदार मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या सहाकार्याने उपाययोजना राबविल्या आणि लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण अगदी कमी झाले,At that time, Yogi Adityanath was weeping, Prime Minister Narendra Modi recalled
अशी आठवण सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कसंर्शी संवाद साधला.
यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले, पूर्वांचल प्रदेशात अगोदर लहान मुलांमध्ये मेंदूंच्या आजारामुळे विदारक परिस्थिती होती. त्यामुळे, दरवर्षी हजारो मुले मृत्यूमुखी पडत होती.
योगी आदित्यनाथ जेव्हा खासदार होते, तेव्हा लहान मुलांच्या होणाºया मृत्युंमुळे ते संसदेत धाय मोकलून रडले होते. या लहान मुलांना वाचविण्याची विनंतीपूर्ण मागणी ते करत होते. मात्र, योगी आदित्यनाथ जेव्हा मुख्यमंत्री बनले,
तेव्हा केंद्र सरकारसोबत एकत्र येऊन त्यांनी मेंदूंच्या आजारासाठी उपायांचे अभियान राबवलं. सद्यस्थिती कित्येक लहानग्यांना वाचविण्यात आपल्याला यश आले.
पंतप्रधान म्हणाले, जहाँ बिमार, वहाँ उपचार हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रोकंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावात औषधे वाटत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे.
ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनविरुध्द लढण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लढताना अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागला आहे. यावेळी संक्रमणाचा वेग पहिल्यापेक्षा अधिक आहे. रुग्णांना जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला असल्याचे मोदी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App