Election Results : गतनिवडणुकीत कोणत्या राज्यात काय होता निकाल, जाणून घ्या एका क्लिकवर

Assembly Elections Results Live, Know Who won In 2016 Assembly Elections West Bengal, Assam, Tamilnadu, Puducherry, Kerala in Details

Election Results : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. निकालानंतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल हे ठरविण्यात येईल. २०२१ च्या निकालापूर्वी आपण या राज्यांमधील 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या जागांचे गणित काय होते ते पाहूया. Assembly Elections Results Live, Know Who won In 2016 Assembly Elections West Bengal, Assam, Tamilnadu, Puducherry, Kerala in Details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. निकालानंतर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल हे ठरविण्यात येईल. २०२१ च्या निकालापूर्वी आपण या राज्यांमधील 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या जागांचे गणित काय होते ते पाहूया.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची सत्ता

पश्चिम बंगालमधील 2016च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला (टीएमसी) प्रचंड बहुमत मिळाले. राज्यातील 294 विधानसभा जागांपैकी टीएमसीने 211 जागा जिंकल्या. कॉंग्रेस 44 जागा जिंकून राज्यात दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. मागील निवडणुकीत सीपीएमला 26, सीपीआयला 1, आरएसपीला 3, फॉरवर्ड ब्लॉकला 3, गोरखा जनमुक्ती मोर्चाला 3 आणि अपक्षांना एक जागा मिळाली. त्याचवेळी भाजपाने 3 जागा जिंकल्या होत्या.

तामिळनाडूत अण्णाद्रमुकने रोवला होता झेंडा

तामिळनाडूमधील मागील विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकने (एआयएडीएमके) बहुमत मिळवले होते. एआयएडीएमकेने राज्यात 234 विधानसभा जागांपैकी 136 जागा जिंकल्या होत्या. द्रमुक (द्रमुक) यांना 89 जागा मिळाल्या. 2016च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 8 जागा मिळाल्या, तर इंडियन युनियन मुस्लिम लीगला १ जागा मिळाली होती.

पुडुचेरीमध्ये कॉंग्रेसचा 15 जागांवर झाला होता विजय

केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे 2016च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने राज्यातील 30 पैकी 15 विधानसभा जागा जिंकल्या, तर एआयएनआर कॉंग्रेसने 8 जागा जिंकल्या. एआयएडीएमकेने 4 आणि द्रमुकने 2 जागा जिंकल्या होत्या. तर अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली होती.

केरळमध्ये एलडीएफला मिळाले होते बहुमत

केरळमधील 2016च्या विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) बहुमत मिळाले होते. एलडीएफने राज्यातील 140 पैकी 91 जागा जिंकल्या. एलडीएफमध्ये सीपीएम 58, सीपीआय 19, जेडीएस 3, राष्ट्रवादी 2, सीएस 1, केसी (बी) 1, एनएससी 1, सीएमपी 1 आणि अपक्षांनी 6 जागा जिंकल्या. त्याचवेळी कॉंग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 47 जागा मिळाल्या. यूडीएफमध्ये कॉंग्रेसने 22, इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) १, केरळ कॉंग्रेस (एम) 6 आणि केरळ कॉंग्रेस (जे) 1 जागा जिंकली होती. राज्यात भाजपने एका जागेवर विजय मिळवला होता.

आसाममध्ये भाजपने प्रथमच सत्ता स्थापन केली होती

आसाममधील 2016च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. राज्यातल्या 126 विधानसभा जागांपैकी 86 जागा जिंकल्या. एनडीएत समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये भाजपाने 60 जागा, आसाम गण परिषद 14, बोडोलँड पीपल्स फ्रंटला 12, आरजेएएमला 1 आणि टीजेएएमने 1 जागा जिंकली होती. राज्यात कॉंग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. एआययूडीएफने 13 जागा जिंकल्या आणि अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली होती.

Assembly Elections Results Live, Know Who won In 2016 Assembly Elections West Bengal, Assam, Tamilnadu, Puducherry, Kerala in Details

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय