त्रिपूरा, नागालँड, मेघालयात विधानसभा निवडणुका जाहीर; त्रिपुरात 16, तर नागालँड, मेघालयामध्ये 27 फेब्रुवारीला मतदान; निकाल 2 मार्चला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला, तर नागालँड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच तिन्ही राज्यांमधील मतमोजणी २ मार्चला होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. Assembly elections announced in Tripura, Nagaland, Meghalaya

केंद्रीय निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या निवडणुकीत तिन्ही राज्यांमधील पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा सहभाग जास्त होता. देशासाठी हे एक चांगले उदाहरण आहे. या तिन्ही राज्यांमधील निवडणुका शांततेत पार पाडण्यास आमचे प्राधान्य असेल. तसेच फेक न्यूजला सामोरे जाण्यासाठी आयोगाने एक योजना तयार केली आहे.

नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा विधानसभांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १२ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन कराव्या लागतील.

तिन्ही राज्यांमध्ये कोणती सरकारे?

त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता असून २०१८ च्या निवडणुकीत राज्यातील एकूण ६० जागांपैकी भाजपने ३५ जागांवर विजय मिळवला होता. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला फक्त १६ जागा जिंकता आल्या.

मेघालयातील २०१८च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आले नाही. मेघालयाच्या एकूण ५९ जागांपैकी काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. तर एनपीपीला १९, भाजपला २, यूडीपीला ६ जागा मिळाल्या होत्या. भाजपने नॅशनल पीपल्स पार्टीसोबत युती केली होती. तसेच नागालँडमध्ये भाजप नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टीसोबत युती करून सरकार स्थापन केले होते.

Assembly elections announced in Tripura, Nagaland, Meghalaya

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात