विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना आहेत, अशी टीका सरमा यांनी केली आहे.Assam CM attacks Rahul Gandhi again, says Rahul Gandhi is Modern day Mohammed Ali Jinnah
तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का? असा प्रश्न सरमा यांनी केला होता. त्यावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरमा म्हणाले, आमचे लष्करी जवान शत्रूच्या प्रदेशात कोणत्याही कारवाईसाठी जाण्यापूर्वी एक महिन्यासाठी योजना आखतात,
या धोरणात्मक कारवाया असतात आणि कारवाई झाल्यानंतर प्रेस रिलीज जारी केले जाते, त्यानंतर आम्हाला कळते. जर कोणी कारवाईचा पुरावा मागत असेल तर असा पुरावा मागितल्यावर लष्कराच्या जवानाला किती वेदना होतात याचा विचार करा.
राहुल गांधींना असे वाटते की भारतात गुजरात ते पश्चिम बंगालचा समावेश आहे, गेल्या दहा दिवसांपासून मी असे प्रकार पाहतोय. एकदा त्यांना भारत राज्यांचा संघ वाटतो, तर दुसऱ्यांदा भारत केवळ गुजरात ते बंगालपर्यंत आहे. ते वाटेत ते बोलताहेत म्हणून मी म्हणतोय की राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलंय. जिना जी भाषा १९४७ पूर्वी वापरत असत ती आता राहुल गांधी वापरत आहेत. एक प्रकारे राहुल गांधी आधुनिक काळातील जिना आहेत.
उत्तराखंडमधील एका प्रचारसभते सरमा यांनी तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का? असा सवाल केला होता. देशाचा अभिमान, जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App