विशेष प्रतिनिधी
बिजींग : चीनमध्ये उईगर मुस्लिमांचा छळ करण्यासाठी २४० ताबा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात असलेल्या उईगर मुस्लिमांना दूरचित्रवाणीच्या संचावरून कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास दाखवण्यात येतो. As many as 240 concentration camps in China to persecute Uighur Muslims
दबनचेंग येथील एका ताबा केंद्रासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी ‘एपी’च्या पत्रकाराने प्रत्यक्षात जाऊन खातरजमा केली. हे ताबा केंद्र २२० एकरावर उभारलेले आहे. या ठिकाणी उईगर मुस्लिमांना ठेवण्यात आले आहे. या कैद्यांना एक ब्लॅक ॲड व्हाइट टिव्हीच्या माध्यमातून चिनी कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास दाखवला जातो.
शिनजियांग प्रांतातील ताबा केंद्राबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ञांच्या मते, धार्मिक सोहळ्यात सामील झाल्याने किंवा परदेशात प्रवेश केल्याच्या कारणावरून उईगर मुस्लिमांना शिक्षा देऊन त्यांची ताबा केंद्रात रवानगी केली जाते. कोलोरॅडो विद्यापीठात उईगरांवर अभ्यास करणारे मानसोपचारतज्ञ डेरेन बायलर म्हणतात, की असंख्य निष्पाप नागरिकांना ताबा केंद्रात डांबून ठेवले असून त्यांचा छळ केला जात आहे.
चौकशीअंती २४० ताबा केंद्र असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक ताबा केंद्रात सुमारे दहा हजार मुस्लिम उईगरांना ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी उईगर मुस्लिमांना ठेवण्यात आले आहे, त्याची स्थिती पाहता चीनकडून इतक्यात ताबा केंद्र बंद केले जातील, असे वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App