मुस्लीमांवरील अन्यायाची चीनला शिक्षा, १४ कंपन्या अमेरिकेच्या काळ्या यादीत


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – चीनमध्ये उइगर समुदाय आणि अन्य मुस्लिम अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायामुळे अमेरिकेने चीनबाबत अधिक कठोर पावले उचलली आहेत. अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने आणखी १४ कंपन्यांवर व्यापार निर्बंध लागू केले असून त्यांचा समावेश काळ्या यादीत केला आहे. USA bans on Chinese companies

चीनमधील या कंपन्या रशियातील सैन्यदलाच्या मोहिमा किंवा आण्विक विकास प्रतिबंध कार्यक्रम अथवा इराणवरील आर्थिक बंदीचे उल्लंघन करण्यासाठी मदत करीत होत्या, असा आरोपही वाणिज्य विभागाने केला आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, चीनमधील उइगर आणि मुस्लिम समाजाच्या शोषणात या कंपन्यांचा कथित हात असल्याने अमेरिकेने ही कारवाई केली आहे. चीनमधील झिंजियांग प्रांतातील मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात दडपशाही, सामूहिक नजरकैद आणि उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे लक्ष ठेवण्यासाठी चीनला इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान आणि अन्य कंपन्यांनी मदत केली आहे.

अशा कंपन्यांना साहित्य अथवा कोणतीही उपकरणे विकण्यास अमेरिकी नागरिकांवर बंदी घातली आहेत. उइगर नागरिकांवरील अत्याचाराविरोधात चीनवर लादलेल्या आर्थिक आणि व्यापारी निर्बंधातील ही नवी कारवाई आहे.

USA bans on Chinese companies

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण