नामांकित कंपनीचे बनावट मीठ विकणारे अटकेत


विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेशच्या फरिदाबाद गुन्हे शाखा ससेक्टर-१७ च्या पथकाने बनावट टाटा मिठाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मीठाच्या १९२५ गोणी पोती जप्त केल्या आहेत. तीन आरोपींमध्ये सेक्टर ८८ मध्ये राहणारा आयुष, जुना फरिदाबादचा उदित आणि भारत कॉलनीचा महेंद्र यांचा समावेश आहे. Arrested for selling fake salt of reputed company

पोलिस प्रवक्ते सुबे सिंह यांनी सांगितले की, टाटा सॉल्ट कंपनीच्या कर्मचाऱ्याने तीन आरोपींवर टाटा कंपनीचे बनावट मीठ विकल्याचा आरोप करत तक्रार केली होती. माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी तिघांनाही भारत कॉलनी जुने फरिदाबाद येथून १९२५ बनावट टाटा सॉल्ट पाऊचसह अटक केली.



आरोपींविरुद्ध खेडी पूल पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. आरोपी टाटा सॉल्टचे बनावट चिन्ह लावून लोकांना विकायचे. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

Arrested for selling fake salt of reputed company

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात