विशेष प्रतिनिधी
मुराद नगर : उत्तराखंड मधील हर्षील या गावामध्ये नुकताच 16 वर्षांपूर्वी बर्फामध्ये दफन झालेल्या नायक अमरीश त्यागी यांच्या मृतदेहावर मंगळवारी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी बऱ्याच लोकांनी गर्दी केली होती. राजकीय, सामाजिक आणि पोलीस प्रशासकीय अधिकारी ह्या शेवटच्या प्रवासात सहभागी झाले होते. अमरीश यांचा भाचा दीपक याने पार्थिवास अग्नी दिला.
Army jawan’s funeral took place after 16 years
तर त्यांची पत्नी आणि मुलगीही शेवटच्या दर्शनासाठी आल्या होत्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास बिहार रेजिमेंटचे सैनिक अमरीश त्यागी यांचा मृतदेह घेऊन गंगानहरला हजर झाले. भारत माता की जय, जब तक सूरज चांद रहेगा, अमरीश तेरा नाम रहेगा अशा घोषणा देखील ह्या वेळी उपस्थित लोकांनी दिल्या. आमदार अजितपाल त्यागी, ब्लॉक प्रमुख राजीव त्यागी, जिल्हा पंचायत सदस्य अमित त्यागी, जेडीयू नेते के.सी. त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी, जिल्हा पंचायत सदस्य पती विकास यादव, सपाचे वरिष्ठ नेते श्रावण त्यागी, नितीन त्यागी याशिवाय एसडीएम आदित्य प्रजापती, सर्व राजकीय एसओ मुरादनगर सतीश कुमार यांच्यासह बरेच लोक ह्यावेळी उपस्थित होते.
धक्कादायक : मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी उसने घेतले होते 500 रुपये, सावकाराने कैक महिने शेतात राबवले; हतबल वडिलांची आत्महत्या
23 सप्टेंबर 2005 रोजी अमरीश त्यागी त्यांच्या काही साथीदारांसोबत गिर्यारोहणासाठी गेले होते. ते1996 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. शिखरावरून खाली उतरताना त्यांची संपूर्ण टीम बेपत्ता झाली होती. यामध्ये तीन सैनिकांचे मृत शरीर मिळाले होते पण अमरीश यांचा मृतदेह सापडला न्हवता. एक वर्षानंतर अमरीशला लष्कराने मृत घोषित केले होते. आता 23 सप्टेंबर रोजी उत्खननादरम्यान अमरीशचा मृतदेह उत्तराखंडमधील हर्षिलमध्येच बर्फात आढळून आला. ड्रेसवरील पट्टे, नेम प्लेट्स इत्यादींनी त्यांची प्राथमिक ओळख पटवण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी लष्करी सन्मानाने पाठवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App