धक्कादायक : मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी उसने घेतले होते 500 रुपये, सावकाराने कैक महिने शेतात राबवले; हतबल वडिलांची आत्महत्या

Shocking Rs 500 was borrowed for the childs funeral, moneylender torment for months in farm father Committs suicide in Palghar

suicide in Palghar : पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आदिवासी व्यक्तीने त्याच्या मालकाच्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केली. गतवर्षी डिसेंबरमध्ये आदिवासी काळू पवार यांचा इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा वारला होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांनी रामदास कोरडे नावाच्या व्यक्तीकडून 500 रुपये उसने घेतले होते. पण जेव्हा पवार 500 रुपये देऊ शकले नाहीत, तेव्हा कोरडेने त्यांना त्यांच्या शेतात अनेक महिने काम करण्यास भाग पाडले. Shocking Rs 500 was borrowed for the childs funeral, moneylender torment for months in farm father Commits suicide in Palghar


विशेष प्रतिनिधी

पालघर : पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आदिवासी व्यक्तीने त्याच्या मालकाच्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केली. गतवर्षी डिसेंबरमध्ये आदिवासी काळू पवार यांचा इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा वारला होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांनी रामदास कोरडे नावाच्या व्यक्तीकडून 500 रुपये उसने घेतले होते. पण जेव्हा पवार 500 रुपये देऊ शकले नाहीत, तेव्हा कोरडेने त्यांना त्यांच्या शेतात अनेक महिने काम करण्यास भाग पाडले. पवार यांनी कामाचा मोबदला मागताच त्यांना मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी रामदास कोरडेला अटक केली आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखडा परिसरातील आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्याचे नाव काळू पवार असे सांगितले जात आहे. ते म्हणाले की, त्यांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारांसाठी पैसे नसल्याने पवार यांनी आरोपी रामदास अनबू कोरडे यांच्याकडून 500 रुपये उधार घेतले होते. यानंतर, कोरडे यांनी पवार यांना कर्जाची परतफेड करण्याच्या नावाखाली अनेक महिने त्यांच्या शेतात काम करायला लावले. याप्रकरणी नुकत्याच मृत झालेल्या पवारांच्या पत्नीच्या (40) तक्रारीच्या आधारे आरोपी कोरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश गवई यांनी सांगितले की, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि जवाहर डीएसपी या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मृत पवारच्या पत्नीने सांगितले की, त्यांचा मुलगा गेल्या वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी गावाजवळ मृत अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केली, चुकून पडली की कोणी त्याला ढकलले हे अद्याप समजू शकलेले नाही. या गरीब कुटुंबाकडे मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कापड खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्यांचे पती आरोपी कोरडेकडे गेले आणि त्याच्याकडून 500 रुपये उसने घेतले होते.

पोलिसांनी सांगितले की, मृताच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारावर मोखडा पोलिसांनी आरोपी रामदास अनबू कोरडे याच्याविरुद्ध कलम 374 (बेकायदेशीर सक्तीचे श्रम) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Shocking Rs 500 was borrowed for the childs funeral, moneylender torment for months in farm father Commits’ suicide in Palghar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात