भारत बायोटेक लसीच्या तिसऱ्या मात्रेच्या परीक्षणास मंजुरी

कोरोनाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन या आपल्या लसीची तिसरी मात्राही तयार केली आहे. भारत बायोटेकच्या लसीच्या नैदानिक चाचणीत म्हणे क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसरी मात्राही देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) मान्यता दिली आहे.Approval of third dose testing of India Biotech vaccine


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : कोरोनाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन या आपल्या लसीची तिसरी मात्राही तयार केली आहे. भारत बायोटेकच्या लसीच्या नैदानिक चाचणीत म्हणे क्लिनिकल ट्रायलमध्ये तिसरी मात्राही देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) मान्यता दिली आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाच्या लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. यासाठी भारतीय बनावटीची भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस परिणामकारक ठरत आहे.या लसीची परिणामकारकता आणखी वाढविण्यात येणार आहे.तिसरी मात्रा हे दुसऱ्या टप्प्याचे हे विस्तारित रूप आहे. यामध्ये कोरोना लसीच्या दुसऱ्या मात्रेनंतर सहा महिन्यांनी ही तिसरी मात्रा देण्यात येणार आहे.

त्यानंतर पुढचे सहा महिने त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. या तिसऱ्या चाचणीमधील लसीचे प्रमाण हे सहा मायक्रोग्रॅम इतके असेल, असे भारत बायोटेकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भारत बायोटेकच्या पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या मात्रेचा प्रभाव हा 81 टक्के इतका असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डपेक्षाही कोव्हॅक्सिन अधिक प्रभावी आहे. अशावेळी जर लसीची तिसरी मात्रा दिली तर त्याचा परिणाम वाढण्याची शक्यता आहे,

असे संशोधक व तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या तिसऱ्या चाचणीला लवकरच सुरुवात होणारआहे. दुसºयाटप्प्यातील लसीची चाचणी ज्या स्वयंसेवकांवर करण्यात आली होती, त्यांच्यावरच या तिसऱ्या टप्प्यातील लसीची चाचणी करण्यात येणार आहे.

Approval of third dose testing of India Biotech vaccine

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*