विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. आता लोकसभेच्या उमेदवारांना ९० लाख तर विधानसभेच्या उमेदवारांना ४० लाख रुपये खर्च करता येणार आहे.An increase made in the limit of election expenses
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना ९० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. याआधी ही मयार्दा ७० लाख रुपये इतकी होती. तर दुसरीकडे छोट्या राज्यांमधील उमेदवारांसाठी खचार्ची मयार्दा ५४ लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली असून कोणत्या राज्यासाठी खचार्ची किती मयार्दा आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.देशभरात येत्या काही महिन्यांत एकूण ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.
यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या राज्यांसोबतच उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा देखील समावेश आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सर्व राज्यांमधील प्रचारसभा आवरत्या घेतल्या असून भाजपासह इतरही काही पक्षांनी आपल्या प्रचारसभांवर मयार्दा घातल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर हहा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात केलेल्या घोषणेमध्ये केंद्रीय कायदा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेचा हवाला देण्यात आला आहे. यासंदर्भात निवडणूक समितीनं केलेल्या शिफारशींचा आधार घेण्यात आल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे.विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाºयाखचार्ची मयार्दा देखील वाढवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना खचार्ची मयार्दा २८ लाखांवरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर लहान राज्यांसाठी ही मयार्दा २० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधील उमेदवारांना आता वाढीव खर्च मयार्देचा फायदा होऊ शकेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App