जेथून हिंदू पलायन करत होते त्या कैरानामध्ये अमित शहा यांचा घरोघर प्रचार!!


प्रतिनिधी

कैराना : उत्तर प्रदेशातील ज्या शहरामधून 2017 पूर्वी हिंदूंना पलायन करणे भाग पडत होते त्या कैराना शहरामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार केला. आता कैराना मधून हिंदूंना पलायन करावे लागत नाही. हिंदू येथे परत आले आहेत त्यांना पाहून निश्चित आनंद होतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेते, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.Amit Shah’s house-to-house propaganda in the carana from which Hindus were fleeing

 

अमित शहा यांनी आज दिवसभर कैराना मध्ये घरोघर जाऊन भाजपचा प्रचार केला. त्यानंतर त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. अनेक बैठकांमध्ये ते सहभागी झाले. या वेळी तेथील हिंदू समाजाने अमित शहा यांचे भरघोस स्वागत केले आणि आपल्या अडचणी त्यांना निवेदन केल्या.

2017 नंतर भाजप सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाले. त्यानंतर कैराना मधून हिंदूंना पलायन करायला लावणारे गजाआड गेले. हिंदू आता कैराना मध्ये सुरक्षित आहेत. अनेक जण आपापल्या घरांमध्ये परत आले आहेत. अशा अनेक कुटुंबांच्या अमित शहा यांनी भेटी घेतल्या. तीन ठिकाणी त्यांच्या बैठकाही घेतल्या. कैराना मधील हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजांना अमित शहा यांनी सुरक्षिततेचे आश्वासन दिले. कैराना मधील प्रचाराचे फोटो अमित शहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

Amit Shah’s house-to-house propaganda in the carana from which Hindus were fleeing

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात