अमित शहा डिनर डिप्लोमसी : सौरव गांगुली नवी राजकीय इनिंग खेळायच्या विचारात!!


वृत्तसंस्था

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली नवी राजकीय इनिंग खेळायच्या विचारात आहे. स्वतः त्यानेच एक ट्विट करून याची हिंट दिली आहे. Amit Shah Dinner Diplomacy: Sourav Ganguly considering playing a new political innings !!

आत्तापर्यंत क्रिकेटने मला भरपूर काही दिले. मुख्य म्हणजे भारतीय जनतेचा सपोर्ट मला क्रिकेट मुळे मिळाला. आज या प्रवासाला 30 वर्ष पूर्ण झाली. 1992 मध्ये मी क्रिकेटचा प्रवास सुरु केला होता. 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा मी काही नवीन काहीतरी करू इच्छितो, की ज्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांची सेवा करू शकेन. त्यांच्या उपयोगी पडू शकेन!!, असे ट्विट सौरव गांगुलीने केले आहे.

– अमित शहा यांच्याबरोबर भोजन

सौरवच्या या ट्विटमुळे देशभरात चर्चेला उधाण आले असून सौरव आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सौरव गांगुली याच्या निवासस्थानी जाऊन रात्रीचे भोजन घेतले होते. त्यामुळे सौरव गांगुलीच्या राजकारण प्रवेशाच्या अटकळीला वेग आला आहे. त्यातच त्याने जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी पडण्याची भाषा ट्विटमध्ये वापरल्यामुळे सौरव गांगुली आता राजकीय पिचवर पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या संघातून सेंचुरी मारणार आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

– बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा नाही

मात्र सुरुवातीला आल्यानंतर सौरवने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाली होती. परंतु, बीसीसीआयचे सचिव आणि अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांनी सौरव गांगुलीने अजून बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु सौरव गांगुली आता पश्चिम बंगाल मध्ये भाजपचा संघातून राजकीय पिचवर उतरणार, असे लोक पक्के धरून चालले आहेत!!

Amit Shah Dinner Diplomacy: Sourav Ganguly considering playing a new political innings !!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात