ऑक्सिजन आणि कोरोनावर उपचाराचे साहित्य आणणाऱ्या जहाजांचे सर्व कर माफ होणार, केंद्र सरकारचा निर्णय


देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी ऑक्सिजनचीसह अनेक प्रकारच्या वैद्यकीय साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणावर साहित्य आणणण्यात येत आहे. त्यासाठी दिरंगाई होऊ नये यासाठी ऑक्सिजनची आणि कोरोनावर उपचाराचे साहित्य आणणाऱ्या जहाजांचे सर्व कर माफ करण्याचे आदेश बंदरांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.All taxes on ships carrying oxygen and treatment materials on corona will be waived, the central government has decided


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी ऑक्सिजनचीसह अनेक प्रकारच्या वैद्यकीय साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणावर साहित्य आणणण्यात येत आहे.

त्यासाठी दिरंगाई होऊ नये यासाठी ऑक्सिजनची आणि कोरोनावर उपचाराचे साहित्य आणणाऱ्या जहाजांचे सर्व कर माफ करण्याचे आदेश बंदरांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.



जलवाहतूक, जहाज आणि बंदर मंत्रालयाने सर्व बंदरांना याबाबतच्या सूचना पाठविल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय साहित्या घेऊन येत असलेल्या जहाजांना सर्वोच्च प्राधान्य बंदरांवर देण्यात यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अनेक जहाजांमधून ऑक्सिजनची भरलेले टॅँकर आंणण्यात येत आहेत. पोर्टेबल आॅक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजनची कॉन्सट्रेंटरही आहेत.मंत्रालयाने याबाबत जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्या देशात ऑक्सिजनची आणि इतर वैद्यकीय साहित्याची तातडीने गरज आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने सर्व बंदरांना आदेश देऊन त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कर किंवा भाडे घेऊ नये असे सांगितले आहे. प्रत्येक बंदरावरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावर वैयक्तिक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

कन्साईनमेंट उतरवून घेण्यासाठी कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये. त्यासाठी कस्टम आणि इतर यंत्रणांनी तातडीने परवानग्या देण्यासाठी समन्वय साधून काम करावे.केंद्राने शनिवारी आदेश देऊन वैद्यकीय साहित्यावरील कस्टम ड्युटीही माफ केली आहे.

त्यामुळे बंदरामध्ये जहाज आल्यापासून त्यातील साहित्य उतरवून ते नियोजित ठिकाणी पाठविण्यास कोणताही अडथळा येणार नाही, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

All taxes on ships carrying oxygen and treatment materials on corona will be waived, the central government has decided

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात