उत्तर प्रदेशात भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांना अखिलेश यादव यांची शिंदे प्रयोगाची ऑफर!!

वृत्तसंस्था

रामपूर : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना चक्क महाराष्ट्रातल्या शिंदे प्रयोगाची ऑफर दिली आहे. तुम्ही भाजपमधून 100 आमदार घेऊन या. समाजवादी पक्षाचे 100 आमदार आहेतच. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तुमच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री व्हा, अशी खुली ऑफर अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना दिली आहे. Akhilesh Yadav offers two deputy chief ministers “shinde experiment” in uttar Pradesh

उत्तर प्रदेशात आजम खान यांची आमदारकी गेल्यानंतर रामपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तेथे झालेल्या प्रचार सभेत अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बंडखोरीची ऑफर दिली आणि बंडखोरीच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद देऊन टाकले. अखिलेश यादव म्हणाले, की उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री आहेत.

पण त्यांचे उपमुख्यमंत्री पद काय कामाचे आहे?? एक उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री असूनही ते साध्या डॉक्टरची पण बदली करू शकत नाहीत आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या खात्याला राज्यात स्वतंत्र बजेटही नाही. त्यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री अधिकारहीन आहेत. त्या पेक्षा त्यांच्यापैकी कोणीही भाजप मधले 100 आमदार फोडावेत. समाजवादी पक्षाचे 100 आमदार आहेत. समाजवादी पक्ष त्यांना पाठिंबा देईल. त्यांनी मुख्यमंत्री बनावे.

अखिलेश यादव यांच्या या शिंदे ऑफरला भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप तरी कोणताही प्रतिसाद दिलेला दिसत नाही. मात्र त्यांच्या शिंदे ऑफरमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणाला राजकीय तडका मात्र मिळाला आहे.

Akhilesh Yadav offers two deputy chief ministers “shinde experiment” in uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात