मल्लिकार्जुन खरगेंच्या पुत्राने पंतप्रधान मोदींबाबत अपशब्द वापरल्यानंतर भाजपाचेही जोरदार प्रत्युत्तर, नड्डा म्हणाले…


कलबुर्गी येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी घेतलेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात प्रियांक खरगेंनी विधान केलं आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीची तारीख जवळ आली आहे. अशा स्थितीत आता पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप  तीव्र झाले आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना विषारी साप संबोधलं होतं, त्यावरून राजकारण तापलेलं असताना, आता खरगेंचे पुत्र प्रियांक खरगे यांची जीभ घसरली आहे. त्यांनी मोदींचा उल्लेख “नालायक पुत्र” असा केला आहे. ज्यावर आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितले की, जे लोक पंतप्रधान मोदींबद्दल असे वक्तव्य करतात ते मानसिक दिवाळखोरीचे बळी आहेत. After Mallikarjun Kharges son Priyank Kharge criticized PM Modi BJP president JP Nadda responded

नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले की, काँग्रेस पक्षच सध्या मानसिक दिवाळखोरीचा बळी ठरला आहे आणि त्यांचे नेते, गांधी घराण्याला अनुसरून पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरत आहेत. आपल्या वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठी ते असे वक्तव्य करत आहेत. नड्डा म्हणाले की, राज्यात यापूर्वीच काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळेच आता त्यांचे नेते अशी विधाने करू लागले आहेत. पण सर्वसामान्य जनता असे विधान स्वीकारणार नाही आणि त्यांचे पंतप्रधानांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल.

कलबुर्गी येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी घेतलेल्या बंजारा समाजाच्या मेळाव्यात प्रियांक खर्गे यांची जीभ घसरली. प्रियांक खरगे म्हणाले, की पंतप्रधान मोदी बंजारा समाजाच्या मेळाव्यात येऊन म्हणाले होते, की बंजारा समाजाने काही काळजी करू नये. त्यांच्यासाठी आरक्षण लागू करू. बनारसचा पुत्र इथे आला आहे. पण हा पुत्र जर नालायक निघाला तर बंजारा समाजाने काय करायचे?, असा सवाल प्रियांक खर्गे यांनी करून आपल्या प्रचाराची पातळी किती घसरली आहे हेच दाखवून दिले!!

After Mallikarjun Kharges son Priyank Kharge criticized PM Modi BJP president JP Nadda responded

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात