कर्नाटक नंतर हिजाबच्या वादाने पश्चिम बंगालही पेटले; मुर्शिदाबाद मध्ये तोडफोड


वृत्तसंस्था

कोलकाता : कर्नाटकातील हिजाबच्या मुद्दयावरून वरून जो वाद पेटला आहे. तो आता हळूहळू देशभरात पसरू लागला आहे. महाराष्ट्रात हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोधात निदर्शने, मोर्चे काढण्यात आले. त्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत. पश्चिम बंगालमध्येही याचे पसादड उमटले आहेत. या प्रकरणावरून पश्चिम बंगाल पेटले आहे .After Karnataka, the hijab controversy ignited West Bengal; Demolition in Murshidabad

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील बाहुली येथे राहणारी एक विद्यार्थिनी हिजाब आणि बुरखा घालून शाळेत पोहोचली होती. मात्र शाळेत हिजाब आणि बुरखा घालून शाळेत येऊ शकत नाही, असे आपल्याला शिक्षकांनी सांगितल्याचा दावा तिने केला. त्यामुळे तिच्या पालकांबरोबर काही लोक शाळेत पोहोचले. या दंगलखोरांनी शाळेची तोडफोड करत दगडफेक केली.



विद्यार्थिनीला हिजाब आणि बुरखा घालण्यास मनाई केल्यावर तिने घरी जाऊन हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी स्थानिक लोकांसह शाळेत पोहोचून जोरदार तोडफोड केली. शाळेतील तोडफोड आणि गोंधळाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, पण लोक ते मानायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. सध्या या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

जयपूरमध्येही मुस्लिम महिलांचे आंदोलन

जयपूरमध्येही मुस्लिम महिलांनी हिजाबच्या वादावरून निदर्शने केली होती. शनिवारी अल्बर्ट हॉलमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन निषेध केला. मुस्लीम महिला म्हणाल्या की, हिजाब घालण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे.

After Karnataka, the hijab controversy ignited West Bengal; Demolition in Murshidabad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात