भाजपा प्रवेशानंतर अपर्णा यादव यांनी घेतले मुलायमसिंह यांचे आशीर्वाद!!

प्रतिनिधी

लखनऊ : समाजवादी पार्टी आणि भाजपमध्ये नेत्यांच्या खेचाखेचीचे जोरदार घमासान जुंपलेले असताना भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अपर्णा यादव यांनी आपले सासरे मुलायम सिंग यादव यांचे आशीर्वाद घेतले आहेत. स्वतः अपर्णा यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. After joining BJP, Aparna Yadav took Mulayam Singh’s blessings !!

समाजवादी पक्षाने भाजप सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदार आपल्या गळाला लावले. त्यावर यादव परिवार फोडून भाजपने राजकीय मात केली. अपर्णा यादव यांना भाजपची सदस्यता दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भाजपुर जोरदार आरोप झाले. परंतु, अपर्णा यादव यांनी मुलायमसिंग यांच्या घरी जाऊन त्यांचा त्यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. हा फोटो अपर्णा यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

अपर्णा यादव यांच्या बरोबरच समाजवादी पक्षाचे माजी आमदार आणि मुलायमसिंह यादव यांचे साडू गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुलायम सिंग यादव आणि शिवपाल यादव यांना अखिलेश यादव यांनी अक्षरश: कैदेत ठेवले आहे. त्यांच्यावर अत्याचार चालवले आहेत, असा आरोप गुप्ता यांनी केला. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी मुलायमसिंग यादव यांची भेट घेणे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

After joining BJP, Aparna Yadav took Mulayam Singh’s blessings !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात