अधीर रंजन चौधरी यांच्या नंतर उदित राज यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर आक्षेपार्ह वक्तव्य; महिला आयोगाने पाठवली नोटीस


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते वरिष्ठ नेत्यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्ये थांबायला तयार नाहीत. आधी अधीर रंजन चौधरी यांनी त्यांचा उल्लेख “राष्ट्रपत्नी” असा केला होता, तर आता उदितराज या माजी खासदाराने त्यांचा उल्लेख “चमचेगिरी” या शब्दाने केला आहे. या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने ताबडतोब या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन उदितराज यांना नोटीस बजावली आहे. After Adhir Ranjan Chaudhary, Udit Raj’s Offensive Statement On President Draupadi Murmu

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गुजरात मध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपतींनी गुजरातमध्ये देशात सर्वाधिक 70 % मीठ उत्पादन होते. त्यामुळे एक प्रकारे असे म्हणता येईल की संपूर्ण देश गुजरातचे मीठ खातो, असे वक्तव्य केले होते. मात्र हे वक्तव्य काँग्रेस नेते, माजी खासदार उदितराज यांना झोंबले आणि त्यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारखे राष्ट्रपती कधीही मिळू नयेत. चमचेगिरी करायची हद्द असते. त्या म्हणतात की 70 % मीठ गुजरात मध्ये उत्पादित होते. संपूर्ण देश गुजरातचे मीठ खातो. पण त्यांनी स्वतः कमावून मीठ खाल्ले म्हणजे त्यांना समजेल, अशी अभद्र भाषा वापरली होती. यातल्याच “चमचेगिरी” या शब्दावर तीव्र आक्षेप घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने उदितराज यांना नोटीस बजावली आहे.

 

 

हेच ते उदित राज आहेत, ज्यांना भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून तिकीट ठेवून निवडून आणले होते. शिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात अभद्र टिप्पणी करण्याची काँग्रेस नेत्यांची ही पहिलीच वेळ नव्हती. त्याआधी लोकसभेतले गट नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख “राष्ट्रपत्नी” असा केला होता आणि त्यांच्या वक्तव्यावरून वाद झाल्यानंतर त्यांनी त्यावर सारवासारव केली होती.

After Adhir Ranjan Chaudhary, Udit Raj’s Offensive Statement On President Draupadi Murmu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात