Adani-Hindenburg Case : सेबीची सर्वोच्च न्यायालयात याचिका, तपास अहवालासाठी मागितली 6 महिन्यांची मुदत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी 6 महिन्यांची आवश्यकता आहे. सेबीने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, त्याचा तपास पूर्ण होण्यासाठी आणि निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी वेळ लागेल.Adani-Hindenburg Case: Sebi’s petition in Supreme Court, seeks 6 months time for investigation report

मार्केट रेग्युलेटरने सांगितले की, हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांप्रमाणे त्या व्यवहारांचा तपास पूर्ण करण्यासाठी किमान 15 महिने लागतील. SEBI ने असेही म्हटले आहे की ते 6 महिन्यांत हा तपास पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.



सेबीने याचिकेत म्हटले आहे की, ‘अशा तपासात प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या माहितीवरून आणखी काही स्तर समोर येतात. अशा गुंतागुंतीच्या व्यवहारांच्या प्रक्रियेत माहिती गोळा करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी वेळ लागतो. आरोप केलेल्या व्यवहारांचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे आणि त्यांच्याशी अनेक उप-व्यवहार संलग्न आहेत. त्यामुळेच या तपासात अनेक स्रोतांकडून माहिती गोळा करून त्याची पडताळणी करण्यास वेळ लागतो.

या तपासणीमध्ये, आम्हाला अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बँकांचे बँक स्टेटमेंटदेखील आवश्यक असेल. आता 10 वर्षांहून अधिक जुनी बँक स्टेटमेंटचीही गरज भासू शकते, त्यामुळे हे सर्व गोळा करणे अवघड होऊन बसले आहे.

2 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत तपास पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितले होते. स्टेटस रिपोर्ट दाखल करण्याची मुदत 2 मे रोजी संपत आहे.

Adani-Hindenburg Case: Sebi’s petition in Supreme Court, seeks 6 months time for investigation report

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात