वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा अडानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनी केली आहे.Adani Group to host in West Bengal Ten thousand crore rupees investment
पश्चिम बंगालमध्ये उद्योग निर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने बंगाल ग्लोबल बिझिनेस समिट २०२२ चे उद्घाटन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अदानी यांनी ही घोषणा केली.कोलकाता येथे बुधवारी प. बंगाल सरकारच्या गुंतवणूक परिषदेत उद्योगपती गौतम अदानी यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वागत केले. यावेळी राज्यपाल जगदीप धनखड उपस्थित होते.
उद्योजकांनी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. त्या म्हणाल्या, राज्यात एका वर्षांत ७५ लाख मनुष्य दिवसांचे नुकसान होत असे, मात्र आज हे प्रमाणे शून्यावर आले आहे. केंद्र सरकारशी बोलून, केंद्रीय यंत्रणा उद्योजकांना ‘त्रास देणार नाहीत’
याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी राज्यपालांना केले.राज्यपाल जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली, मात्र ‘बांधीलकी’ वर भर दिला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App