महापालिका निवडणूक आम आदमी पार्टीने जिंकली, पण दिल्लीत “चंडीगड” होणार?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतली महापालिका निवडणूक आम आदमी पार्टीने जिंकली आहे. आम आदमी पार्टीला 134 भाजपला 104 काँग्रेसला 9 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत. राज्यपाल तिथे 12 नगरसेवकांची नियुक्ती करू शकतात. त्यामुळे दिल्लीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत खरी चुरस आहे . Aam Aadmi Party won the municipal elections

आम आदमी पार्टीने आपल्या विजयाचा मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला असला तरी आकडेवारी मात्र काही वेगळे सूचित करते आहे. वास्तविक एक्झिट पोल नुसार भाजप 15 वर्षाच्या अँटी इन्कमबन्सी मुळे मोठ्या फरकाने पराभूत होईल असे वाटत होते. पण प्रत्यक्षात भाजपने जोरदार टक्कर दिली. आम आदमी पार्टीने जरी 134 जागा जिंकल्या असल्या तरी भाजपचा आकड्याने शंभरी ओलांडल्याने तिथे महापौर निवडणुकीत मात्र खरीच चुरस निर्माण होणार आहे. महापालिकेत पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे क्रॉस व्होटिंग झाले तरी कोणत्याही पक्षच्या सदस्याचे महापालिका सदस्यत्व रद्द होत नाही. नुकत्याच झालेल्या चंदीगड निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले आहे. चंदीगड मध्ये आम आदमी पार्टीने 14 जागांवर विजय मिळवला होता, भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या पण महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी मदत केली आम आदमी पार्टीचे एक मत बाद झाले त्यामुळे आम आदमी पार्टीचा महापौर निवडणुकीत पराभव झाला.

 बंगलोर मध्ये वेगळा अनुभव

बंगलोर महापालिकेत देखील भाजपचे बहुमत असताना तिथल्या काँग्रेस आमदारांनी काँग्रेस उमेदवाराच्या पारड्यात मतदान केल्याने बंगलोर मध्ये काँग्रेसचा महापौर झाला. हे आमदार बंगलोर महापालिकेचे सदस्य आहेत. कोणताही नेता एकाच वेळी आमदार आणि महापालिका सदस्य राहू शकतो. त्यात आडकाठी येत नाही. त्यामुळे बंगलोरमध्ये आमदारांनी महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान केले.

 राज्यपाल नियुक्त 12 सदस्य काय करणार?

या सर्वाचा राजकीय अर्थ असा की दिल्ली महापालिकेत देखील याच पद्धतीने चमत्कार होऊ शकतो. आम आदमी पार्टीचे महापालिका सभागृहात बहुमत असले तरी महापौर निवडणुकीत मात्र काही वेगळे घडू शकते. आकड्यांच्या खेळात दुसरा तुल्यबळ पक्ष बहुमतवाल्या पक्षावर मात करू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आम आदमी पार्टी आणि भाजप यांची जिंकलेल्या जागांची आणि राज्यपाल नियुक्त 12 जागांची आकडेवारी काही प्रमाणात राजकीय दिशा स्पष्ट करते आहे.

Aam Aadmi Party won the municipal elections

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात