दिल्ली महापालिका निवडणुकीत आप – भाजपमध्ये जोरदार टक्कर; पण जनता उडवतीय काँग्रेसची खिल्ली


प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत एक्झिट पोलने दाखवल्यानुसार भाजपचा धुव्वा वगैरे काही उडाला नाही. पण आम आदमी पार्टीने बहुमत मिळवले आहे. दिल्ली महापालिकेचे बहुतेक निकाल लागले आहेत आणि तिथे आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार टक्कर झाल्याचेही दिसत आहे. पण या सगळ्या काँग्रेसचा मात्र अक्षरशः सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे जनता सोशल मीडियावर काँग्रेसची पुरती खिल्ली उडवत आहे. MCD Elections, aap wins, BJP fought tough, but Congress heavily lost

अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून काँग्रेसची खिल्ली उडवणारी वेगवेगळी ट्विट शेअर केली आहेत. काँग्रेस का रिजल्ट है, तो नीचे से देख, असे म्हणत अनेकांनी काँग्रेस किती रसातळाला गेली आहे हेच सूचित केले आहे. त्याचबरोबर अंडरग्राउंड होने का समय आ गया है असा गँग्स ऑफ वासेपुर मधला डायलॉग देखील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. काहींनी महाभारतातील भीष्माचा सीन ट्विटरवरून शेअर केला असून लगता है मुझे मैने जखमी होने के लिए जनम लिया है हा डायलॉग भीष्मांनी जणू काँग्रेससाठीच उच्चारल्याची खिल्ली उडवली आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी जिंकून येईल, असे एक्झिट पोल सांगत होतेच त्यानुसार आम आदमी पार्टीने दिल्लीची निवडणूक जिंकली आहे. पण भाजपने देखील जोरदार टक्कर दिली आहे. पण या दोन बलाढ्य पक्षांच्या टकरीत काँग्रेसचा मात्र पुरता सुपडा साफ झाला आहे. वर जनतेने उडवलेली खिल्ली सहन करावी लागत आहे.

 

MCD Elections, aap wins, BJP fought tough, but Congress heavily lost

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण