88 प्रश्न, 413 पानी उत्तर; तरीही हिंडेनबर्ग – अदानी संघर्षाचे गौडबंगाल कायम!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातल्या प्रख्यात अदानी ग्रुप वर माल प्रॅक्टिसेसचा आरोप करणारे 88 प्रश्न हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने उपस्थित केले खरे, पण या प्रश्नांचे अदानी ग्रुपने उत्तर देण्याआधीच प्रत्यक्ष हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसी वरच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली. 88 Questions, 413 Answers; Yet the Hindenburg-Adani conflict continues

अदानी ग्रुपच्या इन्व्हेस्टमेंट श्रीलंकेपासून पूर्वोत्तर जगात वाढत आहेत. त्यांना पायबंद घालण्याचा चीनचा इरादा आहे म्हणूनच हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसी मार्फत अदानी ग्रुपच्या मूळावरच आघात करण्याचा डाव रचण्यात आल्याचे नॅरिटिव्ह सध्या सेट होत आहे.

त्याच वेळी अदानी ग्रुपने हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीने उपस्थित केलेल्या 88 प्रश्नांना तब्बल 413 पानी प्रत्युत्तर दिले आहे. तरीही हिंडेनबर्ग रिसर्चने हे उत्तर फेटाळले असून राष्ट्रवादाच्या आड कंपनीच्या माल प्रॅक्टिसेस दडून राहू शकत नाहीत, असा असे प्रत्युत्तर दिले आहे. यावर अदानी ग्रुपचे उत्तर अजून यायचे आहे.

पण दरम्यानच्या काळात हिंडेनबर्ग रीसर्च ग्रुप वरच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. अवघ्या 5 ते 10 जणांचा रिसर्च ग्रुप स्वतःला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा रिसर्च ग्रुप म्हणवतो आणि जेव्हा एखादी कंपनी भरारी घेण्याच्या स्थितीत असेल तेव्हाच त्या कंपनीवर आघात करतो, असेही काही शोध सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.


Gautam Adani : तीन दिवसांत गमावले 69 हजार कोटी, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांकही गमावला


या सगळ्यात अदानी ग्रुपच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागल्याच्या बातम्याही आल्या आहेत. पण त्या बातम्या फेक न्युज असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. कारण अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे शेअर खाली आल्याचे दिसत आहे. याचा अर्थ हिंडेनबर्ग रिसर्च एलसीसीचा परिणाम शेअर बाजारात दिसला आहे. पण तो कायमच तसा राहील याची कोणीच खात्री देत नाही.

तसेच आंतरराष्ट्रीय विशेषतः चीन केंद्रित गटात भारतीय अन्य कंपन्या सामील नाहीत ना, या विषयीच्या संशयाला देखील कोणी पुष्टी देत नाही अथवा खंडन करत नाही.

त्यामुळे हिंडेलबर्ग रिसर्च एलसीसी आणि अदानी ग्रुप यांच्यातील कॉर्पोरेट संघर्ष याचे गौडबंगाल कायम राहिले आहे.

88 Questions, 413 Answers; Yet the Hindenburg-Adani conflict continues

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात