vice president venkaiah naidu : देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक हजरजबाबी नेता म्हणून ओळखले जाते. सक्रिय राजकारणात त्यांनी सतत नवे मानदंड गाठले. जोधपूरच्या बॅडमिंटन कोर्टात गुरुवारी नायडूंनी ज्या उत्साहाने आणि जोशाने तेथील मंत्री आणि अधिकाऱ्यांना हरवले, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा खेळ पाहून लोक त्यांच्या फिटनेसचे चाहते झाले आहेत. नायडू यांनी प्रथम राजस्थानचे ऊर्जामंत्री बी. डी. कल्ला यांच्यासोबत बॅडमिंटन सामना खेळला. ऊर्जा मंत्री कल्ला यांची संपूर्ण ऊर्जा त्यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठ्या असलेल्या नायडूंच्या समोर खर्ची पडली, कारण नायडूंनी त्यांना सरळ सेटमध्ये 21 विरुद्ध 12 गुणांनी पराभूत केले. 71-years-Old vice president venkaiah naidu beat rajasthans energy minister and young collector in badminton match
प्रतिनिधी
जयपूर : देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक हजरजबाबी नेता म्हणून ओळखले जाते. सक्रिय राजकारणात त्यांनी सतत नवे मानदंड गाठले. जोधपूरच्या बॅडमिंटन कोर्टात गुरुवारी नायडूंनी ज्या उत्साहाने आणि जोशाने तेथील मंत्री आणि अधिकाऱ्यांना हरवले, ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. त्यांचा खेळ पाहून लोक त्यांच्या फिटनेसचे चाहते झाले आहेत. नायडू यांनी प्रथम राजस्थानचे ऊर्जामंत्री बी. डी. कल्ला यांच्यासोबत बॅडमिंटन सामना खेळला. ऊर्जा मंत्री कल्ला यांची संपूर्ण ऊर्जा त्यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठ्या असलेल्या नायडूंच्या समोर खर्ची पडली, कारण नायडूंनी त्यांना सरळ सेटमध्ये 21 विरुद्ध 12 गुणांनी पराभूत केले.
यानंतर जोधपूरचे तरुण जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह बॅडमिंटन कोर्टात उतरले. जिल्हाधिकारी इंद्रजीत यांचे वय नायडूंच्या वयाचे अर्धे म्हणजेच 37 वर्षे आहे. पण नायडू यांनी त्यांना शटलकॉकवर नृत्य करायला भाग पाडले. अखेर त्यांचा पराभव झाला. यानंतर जोधपूरचे 44 वर्षीय पोलीस आयुक्त जोस मोहन यांनाही नायडूंनी आपल्या खेळाने पराभूत केले.
खेळ सुरू झाल्यावर नायडूंनी पुन्हा वर्चस्व गाजवले. सामन्याचा परिणाम असा झाला की जोस मोहनही नायडूंच्या हातून सामना हरले. यानंतर, उपराष्ट्रपतींसोबत सामना खेळण्यासाठी इतर दोन अधिकारीही कोर्टवर आले, पण सलग तीन सामने जिंकणाऱ्या नायडूंना कदाचित थकवा माहितीच नाही. हे दोन्ही अधिकारीही नायडूविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाले.
उपराष्ट्रपतींनी सलग पाच जणांना पराभूत केल्याने सामन्यांचे अंपायरिंग करणारे प्रशिक्षक घनश्याम मेहरू म्हणाले की, उपराष्ट्रपतींचा खेळ पाहून असे वाटले की ते अनुभवी आहेत. सामन्यातील पॉइंटसाठी खूप मेहनतही केली. नायडूंनी सिद्ध केले की हृदय तरुण असेल तर वयाने काहीही फरक पडत नाही.
71-years-Old vice president venkaiah naidu beat rajasthans energy minister and young collector in badminton match
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App