वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसने अपमान केला नाही, असा दावा पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी केला. त्याला ताबडतोब कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रत्युत्तर दिले.humiliate me then why was Navjot Singh Sidhu allowed to openly criticise & attack me on social media & other public platforms
यातून कॅप्टन साहेब आणि काँग्रेस यांच्यातील वाद आणखीनच चिघळला आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले, की माझा अपमान केला नाही, असे हरीश रावत यांचे म्हणणे आहे. मग नवज्योत सिंग सिद्धू गेले सहा-आठ महिने माझ्याविरुद्ध रोज सोशल मीडियात गदारोळ माजवत होते.
If the party didn't intend to humiliate me then why was Navjot Singh Sidhu allowed to openly criticise & attack me on social media & other public platforms for months? Why did the party give the rebels,led by Sidhu, a free hand in undermining my authority?:Captain Amarinder Singh — ANI (@ANI) October 1, 2021
If the party didn't intend to humiliate me then why was Navjot Singh Sidhu allowed to openly criticise & attack me on social media & other public platforms for months? Why did the party give the rebels,led by Sidhu, a free hand in undermining my authority?:Captain Amarinder Singh
— ANI (@ANI) October 1, 2021
तो अपमान नाही तर दुसरे काय होते? मी वारंवार काँग्रेस हायकमांडकडे त्यांच्याविषयी तक्रारी केल्या त्याची दखल काँग्रेस हायकमांडने घेतली का? उलट काँग्रेस हायकमांडने माझ्या इच्छेविरुद्ध त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेमले. मुख्यमंत्री बदलाच्या वेळी देखील मी विधिमंडळ पक्षाचा नेता असताना मला न विचारता किंवा न सांगता परस्पर विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली. हा विधिमंडळ नेत्याचा अपमान नाही तर दुसरे काय आहे?, असे बोचरे सवाल कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी विचारले.
हरीश रावत यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांवर टीकास्त्र सोडताना त्यांचा काँग्रेसने कधी अपमान केला नाही. उलट त्यांनीच काँग्रेसने पंजाबच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यांच्या विरुद्ध अनेक मंत्र्यांनी तक्रारी केल्या. तरी काही वर्षे त्यांना नेतृत्वपदी काँग्रेसने कायम ठेवले. मी स्वतः त्यांच्याशी मोफत वीज शेतकऱ्यांची धान्य खरेदी या आश्वासनावर विषयी पाच वेळा चर्चा केली. परंतु या विषयांमध्ये त्यांच्याकडून काही प्रगती झाली नाही, असा दावा केला होता. त्याला कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. यातून हा वाद शमण्याऐवजी आणखीनच चिघळला असल्याचे स्पष्ट झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App