जम्मूत नियंत्रण रेषेपाशी बीएसएफच्या कारवाईत 7 घुसखोर ठार, 50 किलो ड्रग्स, मोठा शस्त्रसाठा जप्त; मोठा घातपात टळला


वृत्तसंस्था

जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरांविरोधात सीमा सुरक्षा दलाची जोरदार कारवाई सुरू असून गेल्या 24 तासांत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी धडक कारवाई करत 7 घुसखोरांना मारले असून त्यांच्याकडून 50 किलो ड्रग्स आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. हे दहशतवादी भारतात मोठ्या घातपाती कारवाईच्या इराद्याने घुसखोरीच्या प्रयत्नात होते. 7 infiltrators killed in BSF operation along Line of Control in Jammu

जम्मू आणि काश्मीरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागातून वेगवेगळ्या मार्गाने पाकिस्तानी दहशतवादी घुसखोर भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सीमा सुरक्षा दलाने वेगवेगळ्या पोस्ट जवळ प्रतिबंधात्मक कारवाया करून घुसखोरांना रोखले आहे. गेल्या 24 तासात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी धडक कारवाई करून 7 घुसखोरांना मारले आहे आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आणि शस्त्रास्त्र साठा जप्त केला आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे जम्मू विभागाचे प्रमुख डी. के. बोरा यांनी दिली आहे.

पाकिस्तानी दहशतवादी घुसखोर ड्रोनचा वापर करून भारतीय हद्दीत शस्त्रास्त्रे आणि ड्रग्स टाकत राहतात. परंतु सीमा सुरक्षा दलाने परिणामकारक ड्रोन प्रतिबंधक उपाययोजना करून दहशतवाद्यांचा तो मार्गही रोखला आहे. ज्यावेळी या दहशतवाद्यांनी प्रत्यक्षात भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यापैकी 7 घुसखोरांना मारले. बाकीचे घुसखोर पुन्हा पाकिस्तान हद्दीत पळून गेले.

परंतु, मारलेल्या घुसकरांकडून सीमा सुरक्षा दलाने एके 47 रायफली, पिस्तुले, हॅन्ड ग्रेनेड आणि 50 लाखांचे ड्रग्स जप्त केली आहेत. पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरांविरुद्धची कोणतीही कारवाई थांबणार नाही किंवा तिच्यात ढिलाई येणार नाही, अशी ग्वाही सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक बोरा यांनी दिली.

7 infiltrators killed in BSF operation along Line of Control in Jammu

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात