फडणवीसांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच डेव्हिड हेडली विरुद्धचा खटला यशस्वी; सरकारी वकील उज्ज्वल निकमांची कबुली


प्रतिनिधी

नवी दिल्ली : 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याच्या विरुद्ध भारताने यशस्वी खटला चालविला, त्यामागे त्या वेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची ठरली. त्यांनी राजकीय इच्छाशक्तीने मला आवश्यक ती मदत केल्यामुळे भारत हेडलीविरुद्ध यशस्वी खटला चालवू शकला, अशी कबुली सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. पांचजन्य वृत्त समूहाने दिल्लीत घेतलेल्या काँनक्लेव्ह मध्ये उज्ज्वल निकम यांनी बरेच खुलासे केले. ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. The case against David Headley was successful because of the political will of Fadnavis

या मुलाखतीचा काही अंश :

  • 26/11 हल्ला झाला वर्षे 2008 ला. डेव्हिड हेडलीचा जवाब नोंदवून घेतलेला 2014 ला.
  • 26/11 मुंबई हल्ल्याच्या सूत्रधार डेव्हिड हेडली हा अमेरिकेच्या तुरूंगात होता. 26/11 चा तो सहआरोपी असल्या कारणाने त्याचा जवाब नोंदवून घेणे गरजेचे होते.
  • डेव्हिड हेडली दहशतवादी होता. पण अमेरिकेच्या ताब्यात होता. त्याचा जवाब नोंदवून घेण्यासाठी उज्ज्वल निकम यांना 6 वर्षे लागली. कारण तत्कालीन सरकार हे दहशतवादी धार्जिणे सरकार होते.
  • हेडलीचा जवाब नोंदवून घेण्याची इच्छा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. तेव्हा लगेचच देवेंद्रजी यांनी विचारले, “काय मदत हवी आहे माझ्याकडून?” तेव्हा उज्वल निकम यांनी सांगितले तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी बोलून आपॉइंटमेंट घ्या.
  • देवेंद्रजी यांनी लगेच आपॉइंटमेंट मिळवून दिली. देवेंद्रजी यांच्या कार्य तत्परतेमुळे अजित डोवाल यांच्या डिप्लोमसी मुळे उज्वल निकम यांनी हेडलीचा जवाब नोंदवून घेतला.
  • असे काम करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. ती राजकीय इच्छाशक्ती देवेंद्रजीकडे आहे. मी खुल्या मनाने कबूल करतो. मी हेडली पर्यंत पोहचलो, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच.
  • डेव्हिड हेडलीने भारतातील दहशतवादी आणि आयएसआय कनेक्शन यांचा खुलासा लेखी ईमेल द्वारे केला. त्याने आयएसआय मधल्या अनेक अधिकाऱ्यांचे फोन नंबर्स ईमेलद्वारे भारतात पाठवले.
  • डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा अमेरिकेत झाली आहे. परंतु त्याला पाकिस्तान अथवा भारताकडे सोपवू नये या अटीवर ही शिक्षा आहे. त्यामुळे त्याचा सर्व जबाब हा ईमेल द्वारे घेता येऊ शकला.
  • भारताने हे सगळे पुरावे स्वतःकडे ठेवलेच, पण हे पुरावे पाकिस्तानला देऊन पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली.

The case against David Headley was successful because of the political will of Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात