६ भारतीय दिग्गज व्यक्तिमत्व, ज्यांनी IIT सोडली होती तरीही आज यशस्वी आहेत


विशेष प्रतिनिधी

मुंबई: आयआयटी-जेईई ही परीक्षा क्रॅक करणे सोपे नाही. गेल्या काही वर्षांमध्ये यातील स्पर्धा आणखी वाढली आहे. विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत करतात आणि परीक्षेची तयारी करतात. (तुम्ही कोटा फॅक्टरी ही सिरीज जर बघितली नसेल तर नक्की बघा. तुम्हाला कल्पना येईल की त्यासाठी किती संघर्ष करावा लागतो). पण जगामध्ये असेही काही लोक आहेत ज्यांनी आयआयटीची परीक्षा पासही केली, परंतु त्यांनी ती अर्ध्यावर सोडून दिली आणि आज ते खूप मोठ्या प्रगतीपथावर आहेत. तर आता पण जाणून घेऊया हे कोण आहेत.

6 Popular Indians who are IIT dropout and became successful


मारुती ८०० मधून बर्गर विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला ‘फकिरा’ बनला आयआयएम ए (IIM-A) आयकॉन


१: मुकेश अंबानी : भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी आयआयटी-जेईई परीक्षेत यश मिळवले होते. त्यानंतर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी आयआयटी सोडली. नंतरचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे.

२: शाश्वत नखरानी : 23 वर्षीय शास्वत याने २०१८ साली भारतपे पेमेंट हे ॲप अशनिर ग्रोवर यांच्याबरोबर डिझाईन केले. 2015 साली त्यानी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेतला होता. तिसऱ्याच वर्षी तो ड्रॉपआउट झाला. आज तो आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रीच लिस्ट मध्ये झळकणारा सगळ्यात तरुण व्यक्ति आहे.

३: विनोद राय : विनोद राय यांनीसुद्धा आयआयटी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यांनी आयआयटीमधे न जाता दिल्ली स्कूल ऑफ इकॉनमिक्स मधून इकॉनॉमिक्स विषयात मास्टर्स डिग्री मिळवली. विनोद राय हे भारताचे माजी ऑडिटर जनरल आहेत.

४: नारायण मूर्ती : नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस बद्दल तुम्हाला माहीतच आहे. नारायणमूर्ती यांनी आयआयटी जेईई ची परीक्षा पास केली होती. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना चांगल्या आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये जाता आले नाही. त्यांनी म्हैसूरमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंगला प्रवेश घेतला. आयआयटी कानपूर मधून त्यांनी पदव्युत्तर कोर्स पूर्ण केला. आज त्यांची इन्फोसिस कंपनी लाखो जणांना रोजगार देत आहे.

५: अझहर इकबाल : सातव्या सेमिस्टरमध्ये आयआयटी दिल्लीमधून ड्रॉपआऊट झालेला अजहर इक्बाल आज फेमस एप Inshorts चा सीईओ आणि कॉफौंडर आहे.

6 Popular Indians who are IIT dropout and became successful

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात