वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. त्यासोबत त्यांनी अपघाताची कारणे सुद्धा दिली आहेत. 48,000 killed in National Highway accidents last year: Nitin Gadkari
गेल्या वर्षी एक्सप्रेसवेसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला. नितीन गडकरी म्हणाले की २०१९ मध्ये ही संख्या ५३,८७२ एवढी होती. गडकरी म्हणाले की, अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मोबाईल फोनचा वापर इत्यादींचा समावेश होतो.
मंत्रालयाने अपघात रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. सर्व टप्प्यांवर सुरक्षा ऑडिटद्वारे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रचना, बांधकाम आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा तज्ञांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App