मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तब्बल २६ जणांची गेली दृष्टी, बिहारमधील खळबळजनक घटना


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूरमधील एका नेत्र रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर २६ रुग्णांच्या डोळ्यात संसर्ग झाला आहे. संसर्गामुळे सहा रुग्णांचे डोळे काढावे लागले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्व बाधित रुग्णांची दृष्टी गेली आहे. 26 persons harms due to eye operation

पीडित सहा रुग्णांचे नातेवाईक सरकारी शल्कचिकित्सां्ना भेटण्यास गेल्यावर ही घटना उघडकीस आली. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे रुग्णांचे डोळे काढावे लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुझफ्फरनगरमधील नेत्र रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे शिबिर २२ नोव्हेंबर रोजी आयोजित केले होते. त्यात ६५ जणांवर शस्त्रक्रिया करण्यासत आली.



दोन दिवसांनंतर रुग्णांना घरी सोडण्यात आले. डोळे दुखू लागल्याने त्यांनी रुग्णालयात येऊन तपासणी केली. डोळ्यात संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १५ रुग्णांना उपचारांसाठी पाटण्यातील दृष्टीपुंज रुग्णालयात पाठविण्यात आले. पीडित सहा रुग्णांपैकी सहा जणांचे डोळे काढण्यात आले.

26 persons harms due to eye operation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात