बंगालमध्ये 2 मालगाड्यांची धडक, 12 डबे रुळावरून घसरले; बालासोर दुर्घटनेनंतर 22 दिवसांनी दुसरा रेल्वे अपघात

वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत 12 डबे रुळावरून घसरले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या मोठ्या आवाजाने ओंडा रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच मालगाडीच्या लोको पायलटला सुखरूप बाहेर काढले.2 freight trains collide in Bengal, 12 coaches derail; Second train accident 22 days after Balasore disaster

ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी तीन गाड्यांची धडक झाल्यानंतर 23 दिवसांतील हा दुसरा रेल्वे अपघात आहे. मात्र, यामध्ये जीवित व वित्तहानी फारशी झाली नाही.


पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीची तारीख वाढवण्याचा हायकोर्टाचा प्रस्ताव, नामनिर्देशन 15 ऐवजी 18 जूनला, मतदान 14 जुलैला घेण्याची सूचना


 

आद्रा-खड़गपूर सेक्शनमध्ये 3 तास ​​गाड्यांची वाहतूक ठप्प

रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने आद्रा-खड़गपूर सेक्शनमधील रेल्वे वाहतूक सुमारे 3 तास प्रभावित झाली होती.

मालगाडीचे इंजिन मालवाहू ट्रेनला धडकले

अन्य एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, बांकुराहून विष्णुपूरला जाणारी एक मालगाडी ओंडा स्टेशनच्या लूप लाइनवर उभी होती. त्याच मार्गावर मागून येणाऱ्या दुसऱ्या मालगाडीने त्याला धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, मागील ट्रेनचे इंजिन समोरील मालगाडीवर चढले.

2 freight trains collide in Bengal, 12 coaches derail; Second train accident 22 days after Balasore disaster

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात