असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी दिला १०१ बकऱ्यांचा बळी

विशेष प्रतिनिधी

हैद्राबाद : लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या आरोग्यासाठी आणि दीघार्युष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी दिला. या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.101 goats sacrificed for the longevity of Asaduddin Owaisi

उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांना केंद्र सरकारने दिलेली झेड दर्जाची सुरक्षा त्यांनी नाकारली होती.मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. उत्तर प्रदेशातील मेरठहून दिल्लीला निघालेल्या खासदार ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

३ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थक त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीघार्युष्यासाठी प्रार्थना करत आहेत. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली.

101 goats sacrificed for the longevity of Asaduddin Owaisi

महत्त्वाच्या बातम्या