विशेष प्रतिनिधी
मीरत : शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी मीतरमध्ये पत्रकार परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली.Punish them by voting against BJP, appeal of Sunyakta Kisan Morcha
योगेंद्र यादव म्हणाले, ६ फेब्रुवारी रोजी क्रांतीचे ठिकाण असलेल्या मीरतमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाबाबत हन्नान मोल्ला आणि राकेश टीकैत यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यात एकच संदेश आहे की शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या.
राकेश टीकैत म्हणाले, पश्चिम उत्तर प्रदेशला विकासाची चर्चा करायची आहे. हिंदू, मुस्लीम, जिन्ना, धर्माच्या गोष्टी करणाºयांना मतांचे नुकसान होईल. मुजफ्फरनगर हिंदू-मुस्लीम सामन्याचे मैदान नाही. आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलनात जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हटलं नाही.
देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकºयांचे नावही घेत नाहीत. आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलना दरम्यान जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हणणे टाळले आहे. त्यांच्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत.
याआधी देखील संयुक्त किसान मोर्चाने ४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या नागरिकांना भाजपाला शिक्षा देण्याचं आवाहन केलं होते. भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांना शिक्षा द्यावी, असं म्हटलं होतं. शेतीमालाला हमीभावावर समिती स्थापन करणे आणि शेतकऱ्यांविरोधातील प्रकरणे मागे घेण्यासह अनेक मागण्या अपूर्ण असल्याचं शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App