Yogi Adityanath : ‘आज शेजारच्या देशांमध्ये हिंदूंना शोधून मारलं जातंय’ मुख्यमंत्री योगींचं मोठं वक्तव्य!

Yogi Adityanath

बांगलादेशात अजूनही हिंसाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : बांगलादेशात शेख हसीना सरकार पाडण्यात आले आहे. देशात अजूनही हिंसाचार मोठ्या प्रमाणात सुरू असून अनेक ठिकाणी हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. त्याचे व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath )यांनी हा मुद्दा उपस्थित करत मोठे वक्तव्य केले आहे.



अयोध्या दौऱ्यावर दिलेल्या एका वक्तव्यात मुख्यमंत्री योगी बांगलादेशचे नाव न घेता म्हणाले, ‘शेजारील देशात हिंदूंना शोधून मारले जात आहे. इतिहासातून शिकायला हवे. निर्धाराने एकत्र काम करावे लागेल. आज देशभरात अयोध्यावासीयांचा सन्मान होत आहे. आदर मिळवण्यासाठी, आदर राखला पाहिजे. सनातन धर्मावर येणाऱ्या संकटासाठी पुन्हा एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

खरे तर गेल्या दोन दिवसांपासून हिंदूंची मंदिरे आणि घरांची जाळपोळ आणि तोडफोडीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यादरम्यान युजर्स सोशल मीडियावर हे शेअर करत आहेत आणि सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Yogi said Hindus are being killed in neighboring countries

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात