योगी सरकारने शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने शेतकऱ्यांवरील पराली जाळल्या प्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, पराली जाळणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे परत घेतले जातील. यानंतर आता सरकारने हे खटले मागे घेतले आहेत. yogi government withdraws more than 800 cases on farmers for burning stubble
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : योगी सरकारने शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने शेतकऱ्यांवरील पराली जाळल्या प्रकरणी दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, पराली जाळणाऱ्या शेतकऱ्यांवरील गुन्हे परत घेतले जातील. यानंतर आता सरकारने हे खटले मागे घेतले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारे पराली जाळल्याप्रकरणी शेतकऱ्यांवरील 868 केसेस परत घेतल्या आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी एका निवेदनात म्हटले की, शेतकरी विकासात महत्त्वपूर्ण घटक आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांवरील पराली जाळल्याप्रकरणी 868 केसेस मागे घेतल्या आहेत.
गत महिन्यात योगींनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी संवादादरम्यान याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री असेही म्हणाले होते की, केसेस परत घेण्यासोबतच शेतकऱ्यांवरील दंडही माफ केला जाईल. यादरम्यान उसाचे पेमेंट करण्याविषयी तसेच दरवाढीच्या मुद्द्यांवरही शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. संभाषणादरम्यान त्यांनी सर्व खटले परत घेण्याचे आश्वासन दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App