विशेष प्रतिनिधी
प्रयागराज: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अत्यंत सुसंस्कृत आहेत. ते म्हणजे माझीच चांगली आवृत्ती आहेत, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी कौतुक केले आहे. योगींनी राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी समर्पणाने काम केले आहे. कोणीही प्रतिस्पर्धी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असेही भारती म्हणाल्या.Yogi Adityanath is my best version, Uma Bharti appreciated the speed of work
प्रयागराज दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले काम अतुलनिय आहे. त्यांच्या कोणाही प्रतिस्पर्ध्यांत इतकी क्षमता नाही. त्यांनी केवळ स्वत:ला सिद्ध केले नाही, तर राज्यातील जनतेची अथक सेवा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षच सत्तेवर येणार असल्याचा दावा करून उमा भारती म्हणाल्या, लोक परिवारवाद आणि भाई-भतिजावादाला कंटाळले आहे. केवळ निवडणुकीपूर्वी सक्रीय होणारे आणि इतर वेळी गायब होणाºया नेत्यांना काहीही मिळणार नाी. समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातच वाद आहेत.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती एकाकी पडल्या आहेत. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉँग्रेसचे युग यापूर्वीच संपले आहे.भारती म्हणाल्या, तुम्ही मतदानादरम्यान सक्रीय झाल्यावर त्याचा फायदा होत नाही.
तुमच्या कामाची दखल जनतेकडून घ्यावी यासाठी किमान पाच ते सात वर्षे कठोर परिश्रम करावे लागतात. त्यामुळेच विरोधी पक्षाला दुहेरी आकडी जागाही मिळणार नाहीत. याचे कारण म्हणजे राज्यातील जनतेने भाजपाला पाठिंबा देण्याचे ठरविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App