विशेष प्रतिनिधी
दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी काल पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नवीन दरात 35 पैशांनी वाढ झाल्याचे यावरून लक्षात येत आहे. झालेली ही वाढ आजवरची नवी आणि विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात आली आहे. तर आता सामान्य नागरिकांना एक लिटर पेट्रोलसाठी आता 100 हून अधिक रुपयांची किंमत मोजावी लागणार आहे.
Yet another hike in petrol prices
पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती :
नव्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 111 रुपये 43 पैसे झाला आहे. तर दिल्लीत हा दर 105 रुपये 49 पैसे इतका झाला आहे. तर पुण्यात पेट्रोलची किमंत 111.25 रुपयांवर पोहोचली आहे.
Petrol Diesel Price : इंधन तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या, दिल्लीत पेट्रोल 104, तर मुंबईत 110 रुपयांच्या पुढे
डिझेलचे वाढलेले दर :
मुंबईत डिझेलचे दर 103 रुपये 15 पैसे, तर दिल्लीत ते 94 रुपये 22 पैशांवर पोहोचले आहेत. तर पुण्यात डिझेलचे दर 100 रुपये 45 पैश्यावर पोहोचले आहेत. इंधनातील ही सलग तिसरी दरवाढ आहे.
लास्ट तीन आठवडय़ांतील पेट्रोलमधील ही 15 वी, तर डिझेलमधील १८ वी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे, सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शंभरी चा आकडा ओलांडला आहे.
दररोज ऑफिसला जावं लागणाऱ्या आणि स्वतःची ज्यांच्याकडे वाहणार आहेत, अशा लोकांना रोजच्या रोज पेट्रोल भरावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना आता हा वाढलेला खर्च परवडणारा नसल्याने त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. आणि वाढलेल्या दर वाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App