Yashshree Shinde murder : यशश्री शिंदे हत्येतील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या; खुनाची दिली कबुली, कर्नाटकातून अटक

Yashshree Shinde murder

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उरण परिसरात राहणाऱ्या 20 वर्षीय  च्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर हिल परिसरातून ताब्यात घेण्यात अाले. यशश्रीचा(Yashshree Shinde)निर्घृण खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले. सन २०१५ मध्ये छेडछाड प्रकरणी पाॅक्सोचा गुन्हा दाखल केल्याचा सूड दाऊदने घेतला असून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा अारोप यशश्रीच्या वडिलांनी केला अाहे.

खून केल्यानंतर दाऊद कर्नाटकात पळून गेला होता. पीडित मुलगी आणि आरोपी दाऊद दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते हे दोघेही संपर्कात होते आणि एकमेकांशी बोलत होते,असे सांगितले जाते. दाऊदने यशश्रीला भेटायला बोलावले आणि नंतर तिची निघृण हत्या करुन तिचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळील झाडाझुडपात फेकून दिला होता. दाऊदने चाकूने वार केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांनी दिली. मृत यशश्रीचा चेहरा विद्रुप झाला होता. ते पाहता जंगली प्राण्याने किंवा कुत्र्यांनी तो ओरबाडला असावा. मात्र संपूर्ण सविस्तर शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. आतापर्यंत या प्रकरणाच्या तपासात दाऊद शेख हाच आरोपी असल्याचे दिसत असले तरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही,असे साकोरे म्हणाले.



 

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात दाऊद यशश्रीचा पाठलाग करताना दिसला. विशेष म्हणजे, कर्नाटकमधून पोलिसांनी अजून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी दाऊद हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. त्याची चौकशी करण्यात येत आहे. दाऊद आणि त्याच्यामध्ये काय संवाद झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण

२५ जुलै रोजी नवी मुंबईतील उरण पोलीस ठाण्यात यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर २७ जुलैला सकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला. दाऊद शेख पूर्वी उरणमध्ये राहत होता. तो आणि मृत मुलगी दोघेही त्याच ठिकाणी राहत होते. पण त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कर्नाटकात गेला. तो तिथे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्याने एक-दोन कंपन्याही बदलल्या होत्या.

Yashshree Shinde murder

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात